करांच्या दहशतीपासून वाचवा : राफेलचे सीईओ

भारतात दीड हजार लाख डॉलर्सची गुंतवणूक करणार

नवी दिल्ली : भारताने आकर्षक व्यावसायिक वातवरण द्यावे, कर आणि सीमाशुल्काच्या नियमांनी आम्हाला घाबरवू नये, अशी अपेक्षा राफेल लढाऊ विमानाचे निर्माते साफ्रनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हर अँड्रीज यांनी व्यक्‍त केली. त्याच बरोबर दीड हजार लाख डॉलर्सची भारतात गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आखत आहे, असेही त्यांनी जाहीर केले.

भारताने विकत घेतलेल्या राफेलमधील सुविधांबाबतचे सादरीकरण राजनाथसिंह यांच्या समोर केले. त्यावेळी अँड्रीज बोलत होते. प्रशिक्षण आणि देखभालीसाठी कंपनी भारतात दीड हजार लाख डॉलर्सची गुंतवणूक केण्याची योजना आखत आहे. मात्र कररचनेबाबत भारताकडून अधिक सहकार्याची अपेक्षा आहे.

भारत ही हवाई उड्डाण क्षेत्रातील तीसरी मोठी बाजारपेठ बनली आहे. त्यामुळे भारतात देखभाल आणि दरुस्तीची सशक्त सेवा देण्याची आमची योजना आहे, असे ते म्हणाले. यावेळी राजनाथसिंह यांनी भारत गुंतवणूकदारांना योग्य वातावरण निर्मितीसाठी कटीबध्द असल्याचे सांगून आश्‍वस्त केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)