पुण्यात ‘राज’गर्जनेला मेघ गर्जनेचे आव्हान; अखेर सभा रद्द

पुणे: राज ठाकरे यांची पुण्यातील प्रचाराच्या शुभारंभाचा सभा अखेर रद्द झाली. शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेच्या मैदानात राजगर्जना होणार होती. मात्र पावसानेही सध्या जोरदार बॅटिंग सुरु केली आहे.  भर पावसातही मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपास्थित होते.पावसामुळे मैदानात पाणी साचल्याने सभा रद्द करावी लागली.

आजच्या सभेकडे राजकीय कार्यकर्त्याचे लक्ष लागले होते. ईडीच्या कारवाई नंतर प्रथमच राज ठाकरे सभा घेणार होते. पुण्यातील काही मतदार संघात मनसेचे उमेदवार तगड्या स्पर्धेत आहेत. त्यामुळे या सभेकडे मनसेसह विरोधकांचेही लक्ष होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)