राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार म्हणाले की…

जळगाव: काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार भडकले आहेत. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असून माझ्या पक्षाची स्थिती मला अधिक चांगली माहिती आहे, सुशीलकुमार शिंदे हे त्यांच्या पक्षाबाबत बोलले असावेत” अशा शब्दात पवारांनी शिंदे यांना उत्तर दिले आहे.

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता थकले असून भविष्यात दोन्ही पक्ष एक होणार आहेत, आम्ही एकाच आईची लेकरे आहोत आणि एकाच आईच्या मांडीवर दोन्ही पक्ष वाढलेले आहेत. असे वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केले होते.

सध्या शरद पवार हे विधानसभा निवडणुकीतील आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून. पवार यांनी मंगळवारी सकाळी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. शिंदेनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तूळात एकच चर्चा रंगली होती. परंतु शरद पवारांनी या चर्चेला पूर्ण विराम दिला आहे.

उद्धव ठाकरेंचा टोला 

शिंदेनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ला जोरदार टोला लगावला आहे. ‘शिंदे म्हणाले की दोन्ही काँग्रेस पक्ष थकले आहेत, कदाचित खाऊन-खाऊन थकले असतील, अशी बोचरी टीका ठाकरे यांनी संगमनेर मध्ये केली आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here