डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साधेपणाने साजरी करा-आठवले

नवी दिल्ली: करोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात 14 एप्रिल पर्यंत संचारबंदी लागू आहे. लोकांनी गर्दी करू नये, घरीच रहावे, असे आवाहन सरकारतर्फे केले जात आहे. तरी सर्व नागरिकांनी 14 एप्रिलला घराबाहेर न पडता घरीच राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

बाबासाहेबांची जयंती जगभर साजरी केली जाते. मात्र यंदा करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी जबाबदारीने वागावे, करोनाचा नायनाट झाल्यावर एकत्रितपणे, उत्साहाने बाबासाहेबांची जयंती साजरी करू, असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.