टाकळीभान येथे एसटीचा वाढदिवस साजरा

टाकळीभान: महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या तसेच राज्याची जीवनवाहिनी ठरलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळा 71 वा वाढदिवस टाकळीभान येथे आज भाजप, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज येथील बसस्थानक परिसरात करण्यात आला.

1947 ला ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यानंतर 1 जून 1948 ला प्रवासी वाहतूक करण्यासाठी बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कार्पोरेशन या कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीची पहिली प्रवासी वाहतूक करणारी बस नगर ते पुणे या रस्त्यावर याच दिवशी धावली होती. राज्यातील खेड्या-पाड्यांत जाऊन ही लालपरी प्रवाशांना सेवा देत आहे.

या लालपरीचा आज 71 वा वाढदिवस असल्याने येथील भाजप, सेनेच्या कार्यकर्त्यांनी साजरा केला. श्रीरामपूर-नेवासा या राज्यमार्गावरुन धावणाऱ्या शिर्डी-औरंगाबाद या एसटी बसलचे पूजन करून चालक दत्तात्रय वैरागर व वाहक गणेश फुलकर यांचा सत्कार केला.प्रवाशांना शीतपेय देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष नारायण काळे, बंडू हापसे, एकनाथ रणनवरे, कोंडिराम लोखंडे, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत लांडगे, बापूसाहेब कोकणे, अशोक रणनवरे, दिलीप शिंदे, जान रणनवरे, नंदू काळे, बाळकृष्ण कोकणे उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.