पुणे: बायकोला टीबी झाल्याने घरात सातत्याने कौटुंबिक होणाऱ्या वादातून नवऱ्याने बायकोचा गळा दाबून व तिचे डोके जमिनीवर आपटून तिचा खून केला. वडगाव गावठाणमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन गवते यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेत सोनाली बाबू शेख (वय 30, आईनगर झोपडपट्टी, वडगाव गावठाण) हिचा मृत्यू झाला आहे.