पुणे: एमएचटी-सीईटीचा निकाल दि. 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. हि परीक्षा इंजिनिअरिंग, फार्मसी व कृषी अभ्यासक्रमाच्या पदवी प्रथम वर्ष प्रवेशासाठी घेण्यात आली होती. बोर्डाच्या बारावी निकालानंतर विद्यार्थ्यांचे सीईटीच्या निकालाकडे लक्ष लागले आहे.
राज्य शिक्षण मंडळाने मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर केला. त्या पाठोपाठ आता एमएचटी-सीईटीला निकाल लागणार असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विद्यार्थ्यांना सीईटीचा निकाल 4 तारखेला सायंकाळी 5 नंतर प्राप्त होणार आहे. यंदा पहिल्यांदाच ही सीईटी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. त्यास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळाल्याचे दिसून आले. निकाल www.mahacet.org या संकेतस्थळावर पाहता येईल.