राजगुरूनगर – गणेश उत्सव काळात शहरातील सर्व गणपतीमंडळांनी व “श्रीं’ची घरगुती स्थापना करणाऱ्या भक्तांनी यंदा साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा व शासनाचे नियम पाळावेत, असे आवाहन राजगुरूनगर नगरपरिषदेच्या वतीने मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांनी केले आहे.
खेड तालुक्यात करोना बधितांच्या संख्येत सातत्याने चढ-उतार होत आहे. त्यामुळे शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्याचे नगरपरिषद हद्दीत पालन करण्यात येणार आहे. सर्व नियमांचे पालन करून नगरपालिका आणि पोलीस व स्थानिक प्रशासनास नागरिकानी सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
हे आहेत नियम
- श्रींची मूर्ती एक दोन दिवस आगोदरच घेवून जावी
- सार्वजनिक ठिकाणी मंडप घालून किंवा रस्त्यावर मूर्ती विक्रीस परवानगी नाही
- घरगुती 2 फुटापेक्षा व सार्वजनिक गणेश मूर्ती 4 फुटांपर्यंत अथवा त्यापेक्षा लहान असावी
- होर्डींग, बॅनर्स, पोस्टर्स लावण्यास परवानगी नाही
- मंडळाच्या सार्वजिनक ठिकणी, चौकात, रस्त्यावर मंडप
- घालून “श्रीं’ची स्थापना करण्यास परवानगी नाही
- ज्याठिकाणी गणेश मंदिरे आहेत, किंवा कायमस्वरूपी मूर्ती ठेवलेली आहे त्याठिकाणी मूर्ती स्थापन करा
- आरती व पूजा केवळ पाच व्यक्तींनी व सोशल डिस्टन्सचे पालन करावे
- घरगुती गणेश मूर्तींचे घरीच विसर्जन करावे
- सार्वजिनक ठिकाणी विसर्जनास परवानगी नाही
- “श्रीं’च्या आगमन, स्थापना विसर्जन आदींसाठी मिरवणूक काढता येणार नाही
- शहरातील हौसिंग सोसायटीमध्ये सार्वजनिक श्री गणेशसची स्थापना करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.