नवी दिल्ली – सैनिकांसोबत दिवाळी (Diwali with soldiers) साजरी करणे हा अभिमानास्पद अनुभव आहे. सैनिक आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळून टाकतात. देश सैनिकांचा ऋणी आहे. तसेच मी प्रत्येक दिवाळी सैनिकांसोबत साजरी करतो. (PM Modi Diwali with soldiers) ज्या ठिकाणी सैनिक तैनात आहेत ते ठिकाण मंदिरापेक्षा कमी नाही, असे सांगत हिमाचलमधील लेपचा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली.
नरेंद्र मोदी (PM Modi) म्हणाले, भारतीय सशस्त्र दल आणि सुरक्षा दलांच्या शौर्याचा उत्सव आणि ही ऐतिहासिक भूमी आणि दिवाळीचा सण (Diwali Festival) हा एक अद्भुत योगायोग आहे. हा प्रसंग माझ्यासह देशवासियांसाठी उत्साहाने भरलेला आहे. जिथे कुटुंब हजर असेल तिथेच उत्सव होतो.
सणासुदीच्या दिवशी आपल्या कुटुंबापासून दूर सीमेवर तैनात होणे, हेच कर्तव्यनिष्ठेचे शिखर आहे. सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाला आपल्या कुटुंबाची आठवण येते, पण देशाच्या कानाकोपऱ्यातही तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसत नाही.
तुम्ही सर्वजण उत्साहाने भरलेले आहात. कारण तुम्हाला माहित आहे की 140 कोटी देशवासीयांचा हा मोठा परिवारही तुमचाच आहे. त्यामुळे देश तुमचा ऋणी आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी तुमच्या सुखासाठी प्रत्येक घरात दिवा लावला जातो. म्हणूनच प्रत्येक पूजेत तुमच्यासारख्या वीरांसाठी प्रार्थना असते. जिथे राम आहे तिथे अयोध्या आहे असे म्हणतात. माझ्यासाठी ज्या ठिकाणी सैन्य तैनात आहे ते मंदिरापेक्षा कमी नाही. जिथे तुम्ही (सुरक्षा दल) तिथे माझा सण आहे.
नऊ वर्षांतील मोदींची दिवाळी
वर्ष आणि ठिकाण
2014 – सियाचीन
2015 – अमृतसर
2016 – किन्नौर
2017 – गुरेझ
2018 – केदारनाथ
2019 – राजौरी
2020 – जैसलमेर
2021 – नौशहरामध्ये
2022 – कारगिल