कोलंबो – श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये साखळी बॉम्बस्फोटांची मालिका घडवून आणण्यात आली होती. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ईस्टर संडे निमित्ताने लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. अशातच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले होते.
या बॉम्बस्फोटांतील मालिकेपैकी एक बॉम्बस्फोट सेबास्टियन चर्चमध्ये सुध्दा झाला होता. या चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित आत्मघाती हल्लेखोरांचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आले आहे. यामध्ये संशयित हल्लेखोर हा एक बॅग घेऊन चर्चमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.
#WATCH Colombo: CCTV footage of suspected suicide bomber (carrying a backpack) walking into St Sebastian church on Easter Sunday. #SriLankaBombings (Video courtesy- Siyatha TV) pic.twitter.com/YAe089D72h
— ANI (@ANI) April 23, 2019
दरम्यान, इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया या दहशतवादी संघटनेने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचे जाहीर केले आहे. श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोमध्ये ३ चर्च व प्रवाशांची वर्दळ असलेल्या ३ हॉटेल्समध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आलेे होते. त्यानंतर अजून २ ठिकाणी आत्मघाती बॉमस्फोट करण्यात आले होते. या बॉम्बस्फोटांच्या मालिकेमध्ये २९० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर ५०० हून अधिक लोक या बॉम्बस्फोट मालिकेमध्ये जखमी झाले आहेत.