नवी दिल्ली – माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच गौतम गंभीरने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर काल सोमवारी २२ एप्रिल रोजी गौतम गंभीरला पूर्व दिल्लीतून लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी घोषित केली होती.
Delhi: BJP's Gautam Gambhir files his nomination for the East Delhi parliamentary constituency. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/mGsVXToS8w
— ANI (@ANI) April 23, 2019
गंभीरने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासूनच तो निवडणूक मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा होती. ती चर्चा खरी ठरवताना भाजपने सोमवारी महेश गिरी यांच्याऐवजी उमेदवार म्हणून गंभीरला पसंती दिली. आता पूर्व दिल्लीत अरविंदरसिंग लवली (कॉंग्रेस), आतिषी (आप) आणि गंभीर यांच्यात तिरंगी लढत होईल.