नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषन विभागाने (सीबीआय) शुक्रवारी देशभरातील भ्रष्टाचाराचा संशय असलेल्या 150 ठिकाणी अचानक छापे टाकले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली आहे. यावेळी सीबीआयने मुंबई, पुणे आणि नागपुरसह विविध शहरात छापे टाकले आहेत.
ज्या जागांवर सीबीआयच्या पथकाने तपासणी केली त्यात रेल्वे, कोळसा, खाण, वैद्यकीय संस्था, भारतीय खाद्य निगम, विद्युत, ट्रान्सपोर्ट, जीएसटी विभाग, सरकारी बॅंक, आर्थिक संस्था, कॅंटोन्मेंट मंडळ, कृषी, महापालिका, नगरपालिकांशी निगडीत सरकारी संस्थांचा समावेश होता. ही विशेष मोहीम प्रामुख्याने अशा सरकारी कार्यालयांत राबवण्यात आली, जिथे सामान्य नागरिक किंवा छोट्या व्यापाऱ्यांना भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो. अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्याने यावेळी दिली.