नवी दिल्ली – केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने मुंबई कस्टम्सच्या दोन उपायुक्त आणि दोन क्लिअरिंग एजंट्सविरुद्ध योग्य सीमा शुल्क आकारणी न करता माल क्लिअर केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.
दोन वर्षांहून अधिक काळ परदेशात राहणाऱ्या लोकांचे पासपोर्ट वापरून त्यांनी ही फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील पहिला गुन्हा तत्कालीन उपायुक्त दिनेश फुलडिया यांच्या विरोधात नोंदवण्यात आला आहे.ते डिसेंबर 2020 ते ऑगस्ट 2021 या कालावधीत मुंबईत कार्यरत होते.
दुसरा गुन्हा ऑगस्ट 2021 ते जुलै 2022 पर्यंत मुंबईत कार्यरत असलेले तत्कालीन उपायुक्त सुभाष चंद्रा यांच्या विरोधात नोंदवण्यात आला आहे. ते जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे कस्टम विभागात तैनात होते.
दोन्ही एफआयआरमध्ये सुधीर पाडेकर आणि आशिष कामदार हे समान सहआरोपी आहेत. ते कस्टम क्लिअरिंग एजंट म्हणून कार्यरत आहेत.