Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) 6.3 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा भूकंप (Earthquake) झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. या विनाशकारी भूकंपामुळे याठिकाणी हजारो नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपामुळे आतापर्यंत 2000 जणांचा मृत्यू झाला आहे, तर हजारो नागरिक जखमी झाल्याचीही माहिती समोर येत आहे.
पश्चिम अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) हा भीषण भूकंप झाला आहे. 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपानंतर जोरदार झटके बसल्याने मोठी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने याबाबत माहिती दिली आहे.
AFGHANISTAN, HERAT | VIDEO
Mortal earthquake hit Afghanistan’s Herat province.
Death toll rises to 1000, but no aid sent there yet.#Afghanistan #earthquakes #Earthquick #AfghanistanEarthquake #Herat #Kabul pic.twitter.com/PhFGmYcq3P
— HADIA News (@HADIANews) October 7, 2023
तालिबानच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांची संख्या 2,000 च्या पुढे गेली आहे. दरम्यान, शोध आणि बचावकार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
एका अफगाणिस्तानच्या(Afghanistan) माध्यमावर, अफगाणिस्तानमधील हेरात शहराच्या पश्चिमेला 40 किमी अंतरावर 6.3 तीव्रतेचा भूकंप झाला, त्यानंतर शेजारील बडघिस आणि फराह प्रांतात जोरदार हादरे जाणवले.शनिवारी अफगाणिस्तानमध्ये जोरदार भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल होती. या शक्तिशाली भूकंपानंतरही पश्चिम अफिगाणिस्तानमध्ये भूकंपानंतर जोरदार हादरे बसले. याचे व्हिडीओही सोशल मीडियावर समोर येत आहेत.