प्रसिद्ध बॉलीवूड गायक अनु मलिक आणि संगीतकार ए आर रहमान त्यांच्या गाण्यामुळे ओळखले जातात. दोघेही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार आहे. कोणत्या ना कोणत्या कारणाने दोघेही नेहमीच चर्चेत राहतात. अशात आता बॉलिवूड पार्श्वगायक सोनू निगमने एआर रहमानचे गाणे बेकार असल्याचे म्हटले आहे. सोनूने अनु मलिकसोबतचा अनुभव शेअर केला.
सोनू निगमने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान इंडस्ट्रीशी संबंधित रंजक गोष्टी सांगितल्या. एका एफएम स्टेशनशी बोलताना त्याने एआर रहमानचे गाणे बेकार असल्याचे वर्णन केले.
त्याने एआर रहमानचे ‘चिगी विगी’ गाण्याबाबत सांगितले. ‘ब्लू’ चित्रपटात चित्रित केलेले ‘चिग्गी विग्गी’ हे गाणे त्यावेळी खूप गाजले होते. याबाबत सोनू निगम म्हणतो की, ‘ते बेकार गाणे आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय पॉप आयकॉन कायली मिनोगने अक्षयसोबत परफॉर्म केले. ‘ तर स्वःताह सोनू निगमने हे गाणे गायले. या गाण्याची निवड त्याच्याकडून चुकून झाली असेही तो सांगतो.
आंतरराष्ट्रीय पॉप आयकॉनची चुकीची निवडही करण्यात आली असेही सोनुने म्हटले आहे. अनु मलिकबाबत सांगताना सोनू निगम म्हणाला,’अनु मलिक यांना अनेक वर्षांचा अनुभव होता. यामुळे मी त्यांना घाबरायचो.’ सोनू निगम पुढे सांगतो की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा मुंबईत आला तेव्हा तो आणि त्याचे वडील अनु मलिक यांना भेटायला गेले होते. अनु मलिक यांच्यासोबतच्या बाँडबद्दल सोनू निगम म्हणतो की, मी खूप काही शिकलो आणि अनु मलिक यांना मी आपला गुरू मानतो.’