पुणे – चिंचवड देवस्थान ट्रस्ट जमीन खरेदी विक्री घोटाळ्याप्रकरणी दौंड न्यायालयाच्या आदेशावरून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी किरण शांताराम भोसले यांनी प्रथमवर्ग न्यायालयात दौंड येथे दाखल केलेल्या क्रिमिनल मिसलेनियस एप्लीकेशन नं.१०९/२०२२ अन्वये दाखल केलेल्या अर्जामध्ये यवत पोलीस ठाण्यातील दाखल असलेले तीन गुन्ह्यातील आरोपी कैलास उर्फ पोपट सर्जेराव तावरे,(रा.मोरगाव,ता.बारामती जि.पुणे) यांचे विरुद्ध वरील गुन्ह्याचे तपासी अधिकारी पी. आर. गंपले यांनी तपास करून तपासमध्ये पोपट तावरे यांचेविरुद्ध “नो इव्हिडिअन्स चार्जेशीट नॉट फाईल”असे नमूद करून दोषारोपपत्र पाठवले होते.
सदरचे दोषारोपपत्र तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या सहीने नारायण शिरगावकर उपविभागीय पोलिस अधिकारी,(बारामती विभाग,बारामती) यांनीदेखील संगनमत करून पोपट तावरे यांच्याविरुद्ध पुरावा असताना आरोपपत्र न ठेवून मदत केली आहे.त्यामुळे सदर प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक आरोपी पोपट तावरे यांचे नाव त्या केस मधून वगळण्यात यावे म्हणून खोट्या स्वरूपाचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.
त्याविरुद्ध फिर्यादी भोसले यांनी पोपट तावरे पोलीस अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा म्हणून दौंड न्यायालयात अर्ज दाखल केला होता.सदर न्यायालय दौंड याने अर्जाची सुनावणी होऊन दौंड न्यायालयाने पोपट तावरे व पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात १५६(३)प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिल्याने यवत पोलीस ठाण्यात गु.रजि.नं ८०७ / २०२२ (भा.द.वि कलम १६७,२१८,४०९,४२०,१२०)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार करीत आहेत