पुणे – सिंहगड रस्ता परिसर ज्येष्ठ नागरिक कॅरम क्लबतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेत अशोक केदारी यांनी विजेतेपद पटकावले. केदारी यांनी अंतिम फेरीत रफिक बागवान यांचा 25-24, 25-22 असा पराभव केला. या स्पर्धेत तब्बल 200 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
उपांत्य फेरीत केदारी यांनी प्रभाकर साठे यांच्यावर 25-20, 25-18 अशी मात केली. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत प्रभाकर साठे यांनी सुनील देशपांडे यांचावर 25-10, 25-16 असा विजय मिळवला.
या स्पर्धेतील एकमेव ब्रेक टु फिनिश केदारी यांनी तर ब्लॅक टू फिनिश रफिक बागवान यांनी केला. स्पर्धेचे पारितेषिक वितरण बांधकाम व्यावसायिक राजाराम परांजपे यांच्या हस्ते करण्यात आले.