मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या करोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक, सिनेकलाकार, राजकीय नेते, बॉलीवूड कलाकार पुढे सरसावले आहेत. बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, वरूण धवन, सनी देओल, अजय देवगण, कार्तिक आर्यन, नाना पाटेकर यांनी करोनाशी लढा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानंतर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार या लढ्यासाठी मैदानात उतरले असून, अनेकांनी सरकारला मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.
दरम्यान, कलाकारांचा हा सहभाग बघता देशाचे पंतप्रधान ‘नरेंद्र मोदी’ यांनी या बॉलिवूड स्टार्सचे भरभरून कौतुक केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे कौतुक करतांना त्यांनी असे म्हटले की, “नागरिकांमध्ये जनजागृती करणे असो किंवा पीएम केयर्स निधीसाठी लागणारे सहकार्य करण्यात कलाकार मुख्य भूमिका बजावत आहेत”.
India’s stars are playing a starring role even in ensuring the health of the nation. They’re playing a leading role in raising awareness as well as in contributing to PM-CARES. Thanks @nanagpatekar, @AjayDevgnFilms, @TheAaryanKartik and @TheShilpaShetty.
— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2020
या सर्व कलाकारांचे आभार मानताना पंतप्रधानांनी ट्विट करत असे लिहिले की, भारताचे कलाकार देशाची स्थिती चांगली व्हावी यासाठी महत्वपूर्ण भूमिका साकारत आहेत.
People from all walks of life have contributed to PM-CARES. They have given their hard-earned money to sharpen the fight against COVID-19.
I thank @Its_Badshah, @RanvirShorey and @GuruOfficial
for contributing to PM-CARES. This will encourage research on defeating Coronavirus.— Narendra Modi (@narendramodi) March 31, 2020