नंदुरबार – वेगात असणाऱ्या एर्टिंगा कारने कंटेनरला जोरदार धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघात 3 मित्रांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात नंदुरबार – निझर रस्त्यावर झाला आहे. कारमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा समावेश आहे.
हिरालाल पवार, अनिल सोलंकी आणि प्रशांत सोनवणे अशी अपघातात मृत्यू झालेल्या जवानांची नावे आहेत. यापेैकी प्रशांत सोनवणे हे रेल्वे सुरक्षा दलात जवान म्हणून कार्यरत होते. या तीन मित्रांच्या अशा जाणाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मारुती सुझुकी एर्टिंगा कारने हे तीन मित्र जात होते. दरम्यान रात्री एकच्या सुमारास यांची कार हॉटेल हायवेजवळ पोहोचली असता समोर असलेल्या कंटेनरला मागून जोराची धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला.