मुंबई – गेल्या दोन वर्षांपासून ज्या चित्रपटाची प्रतिक्षा होती, तो चित्रपट अखेर आज (25 मार्च 2022) मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. एस. एस. राजामौली यांचा बहुचर्चित “रौद्रम रणम रुधिरम’ म्हणजेच ‘RRR’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेरसिक अनेक वर्षांपासून या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते.
या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि रामचरणसह आलिया भट्ट आणि अजय देवगण या सारखे अनेक तगडे कलाकार झळकले आहेत. आरआरआर हा चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित आहे.
दरम्यान, सध्या तरी या चित्रपटाचे फक्त तेलगू व्हर्जन समोर आले असून, सुमारे आठ हजार स्क्रीन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. हा समीक्षकांच्या मते हा चित्रपट ‘बाहुबली 2’ चा रेकॉर्ड तोडणार आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोशल मीडियावर सुद्धा या विषयी चर्चा होताना दिसून येत आहे.