जाधववाडी, (वार्ताहर) – सकल मराठा समाज सेक्टर 16 राजे शिवाजीनगर, पंतनगर, जाधववाडी, चिखली येथील मराठा बांधव भगिनी यांनी रविवारी (दि. 18) मराठा आरक्षण व मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी गणेश चौक, राजे शिवाजीनगर सेक्टर 16 प्राधिकरण येथे कँडलमार्च काढून मराठा आरक्षण संदर्भात घोषणा दिल्या.
मराठा आरक्षणाबाबत घोषणा व सरकारचे जरांगे यांच्या उपोषणाकडे होणारे दुर्लक्ष याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. शासन इतके निगरगट्ट कसे असे संतप्त विधान याप्रसंगी उपस्थितांनी बोलून दाखवले. आज त्या व्यक्तीची प्रकृती खालावली असून नाकातून रक्त येत आहे. त्यांच्या शहीद होण्याची सरकार वाट पाहत आहे का असा सवालही या ठिकाणी उपस्थित करण्यात आला. हा कॅण्डलमार्च अतिशय शांत पद्धतीने शासनाला जाग आणण्याकरिता काढण्यात आला अशी माहिती हेमंत चव्हाण व दीपक डोके यांनी दिली.
गणेश किवळे, सुरेश शिराळे, चंद्रकांत फुगे, विशाल बालघरे, दीपक डोके, हेमंत चव्हाण, रमेश पाटील, संदीप शिंदे, अशोक चव्हाण, अनिल काशिद, सुखदेव सरडे, चेतन भोसले, गावडे साहेब, रामेश्वर निकम, सिंधू किवळे, शैलेजा मापारी, जयश्री शिराळे, साधना चव्हाण, माधवी गडशिंग, प्रणिता बिराजदार या वेळी उपस्थित होते.