पिंपरी, (प्रतिनिधी) – सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत त्यांचा त्रास कमी व्हावा आणि शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत पोहोचावा या दृष्टिकोनातून सुरू करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा या अभियानाचे आयोजन कुदळवाडी येथे करण्यात आले होते. या अभियानाचा कुदळवाडीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचे, माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी सांगितले.
या अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद लाभला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळवून देण्यात मोठे यश आले.
या उपक्रमांतर्गत सर्व नागरिकांना शासनाच्या वैयक्तिक लाभांच्या योजनांबद्दल मार्गदर्शन देखील मिळाले. विविध योजना, त्यांची माहिती, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे व ती कागदपत्रे कशी मिळवायची अशा प्रक्रिया सहज व सोप्या पद्धतीने समजल्या.त्यामुळे पुढील काळात विविध विभागांत जाऊन आवश्यक योजनांसाठी नागरिक पात्र ठरू शकतात. त्यामुळे हे अभियान जनसेवेचे एक मॉडेल म्हणून आदर्शवत ठरेल हा विश्वास आहे. या अभियानात सहभागी झालेले सर्व महापालिका अधिकारी, भागातील ज्येष्ठ नागरिक यांचे यादव यांनी आभार मानले.