बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री किरण खेर सध्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहेत. नुकतीच त्यांची बोन सर्जरी पार पडली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
View this post on Instagram
यानंतर बऱ्याच दिवसांनी किरण खेर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत कॅन्सरवरील उपचार सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांची झलक त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. किरण खेर यांचा मुलगा सिकंदर खेरने इंस्टावर लाईव्ह सेशन केले होते. या दरम्यान व्हिडीओत किरण खेर कोचवर बसलेल्या दिसत आहेत.
त्यांच्या डाव्या हातावर पट्टीदेखील बांधलेली दिसत आहे. व्हिडीओत किरण खेर बऱ्याच अशक्त दिसत आहेत. मात्र त्यांना व्यवस्थित पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. किरण खेर उपचारांमुळे अशक्त नक्कीच झाल्या आहेत.
पण त्यांच्या चेहऱ्यावरचे चिरतरूण हास्य मात्र कायम आहे. किरण यांनी सेशनदरम्यान चाहत्यांचे आभार मानले. या व्हिडीओत सिकंदर, अनुपम व किरण हे तिघेही दिसत आहेत.