नवी दिल्ली – करोनावर मात करण्यासाठी भारताकडून अनेक देशांना लसीचा पुरवठा केला जात आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुड्यू यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत कॅनडाच्यासाठी लसीची मागणी केली.
मोदी यांनी इतर देशांप्रमाणेच लस पुरवठा लवकर केला जाईल अशी ग्वाही यावेळी ट्रुड्यू यांना दिली. जर जगाने कोविड -19 वर विजय मिळविला. तर ते भारतातील प्रचंड औषध निर्माण क्षमता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली या क्षमतेचा जगभर झालेला लाभ, यामुळेच शक्य झाले असेच म्हणावे लागेल असे ट्रुड्यू म्हणाले.
व्हॅक्सीन मैत्री अंतर्गत डॉमनिक प्रजासत्ताक इथे लस पोहचली आहे. डॉमनिक रिपब्लिकचे पंतप्रधान रूजवेल्ट स्केरिट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेचे आभार मानले आहेत. पहिल्या खेपेत 35 हजार मात्रा मिळाल्यानंतर आपल्याला इतक्या लवकर लस मिळेल असे वाटले नव्हते असेही स्केरिट यांनी म्हटले आहे.
72 हजार लोकसंख्या असलेल्या डॉमनिकच्या अर्ध्या जनतेला यामुळे लस घेता येणार आहे. बार्बाडोसलाही लसीच्या मात्रा नुकत्याच पुरवण्यात आल्या. व्हेक्सीन मैत्री अंतर्गत,भारताकडून जगभरातल्या 25 देशांना 2 कोटी 40 लाख मात्रा पुरवल्या जाणार असून यात शेजारील देशांबरोबरच युगांडा, इक्वेडोर, निकारागुआ, मोरक्को आणि नामिबिया यांचाही समवेश आहे.