वॉशिंग्टन – समुद्रातील सर्वात मोठे आकर्षण असलेला प्राणी म्हणजे शार्क मासा हा मासा शिकार करण्यासाठी प्रसिद्ध आहे पण आज पर्यंत प्रसिद्ध झालेले साहित्य असो किंवा निर्माण करण्यात आलेले चित्रपट असो प्रत्येक ठिकाणी शार्कला समुद्रात दूरवरून रक्ताचा वास येतो आणि तो लगेच आपल्या भक्ष्यावर हल्ला करू शकतो.
अशा प्रकारचे चित्रण करण्यात आले असले तरी नुकत्याच झालेल्या नव्या संशोधनाप्रमाणे जरी शार्कची वास घेण्याची क्षमता जास्त असली तरी तो जास्त दूरवरून म्हणजे एक मैल अंतरावरून रक्ताचा वास घेऊ शकत नाही शार्क साधारण पाव मैल अंतरावरील रक्ताचा वास घेऊन आपल्या भक्षाचा मागवा मात्र निश्चितच घेऊ शकतो शार्कची वास घेण्याची आणि माग काढण्याची क्षमता माणसापेक्षा 100 पट जास्त आहे पण जरी समुद्रात एखादा रक्ताचा थेंब पडल्यानंतर साधारण पाव मैल अंतरावर जरी त्याला त्याची जाणीव झाली तरी तो लगेच आपल्या भक्षावर हल्ला करू शकत नाही.
समुद्राच्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे रसायने आणि वस्तू मिसळलेल्या असतात त्यात एखादा रक्ताचा थेंब पडला तर लगेच शार्कला त्याची जाणीव होत नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे अर्थात सुमारे पाव मैल अंतरावरील रक्ताचा वास शार्कला येऊ शकतो आणि त्यानंतर तो ज्या ठिकाणी आपले भक्ष असेल असा अंदाज करून जाऊ शकतो पण या सर्व घडामोडींना वेळ लागतो त्यामुळे शार्क लगेच रक्ताचा वास लागल्यावर आपल्या भक्षावर हल्ला करतो असे नाही त्यामुळे ज्या ठिकाणी शार्कचा वावर आहे.
अशा समुद्रामध्ये जर समुद्रात पोहत असताना कोणाला रक्तस्त्राव सुरू झाला तर लगेच घाबरून जाण्याचे कारण नाही कारण शार्क तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या बोटीमध्ये किंवा किनाऱ्यावर पोचू शकता असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे जगभरातील समुद्रात ज्या ठिकाणी शार्कचा वावर आहे अशा समुद्रकिनाऱ्यांचा विचार करता वर्षाला शार्कच्या हल्ल्यामध्ये ठार होणाऱ्यांची संख्या फक्त दहा आहे.