नवी दिल्ली – बेकायदेशीर शस्त्रे विकायला आलेल्या तिघाजणांना पोलिसांनी दिल्लीत अटक केली आहे. त्यांच्याकडून 15 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघेजण राजस्थानातील धोलपूर येथील तर एक जण उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रहिवासी आहे.
त्यांच्याकडून एम.एम. सेमी ऍटोमॅटिक 9 पिस्तुल व त्यांची मॅग्झीन आणि सिंगल शॉट 6 पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. ही शस्त्रे दिल्ली, राजधानी परिसर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील गुन्हेगारांना विकण्यासाठी आणली गेली होती.
मध्यप्रदेशातून दोघेजण शस्त्रे विकायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे केलेल्या कारवाईत तिघाजणांना अटक करण्यात आली, असे विशेष सेलचे पोलीस आयुक्त एचजीएस धालिवाल यांनी सांगितले.