नागपूर : फडणवीस सरकारच्या २०१६ ते २०१८ मध्ये उपयोगिता प्रमाणपत्रे सादर न केल्याचा ठपका ‘कॅग’ने ठेवल्याचे बातमी आहे. या काळात ६५, ९२१.३५ कोटींच्या कामांची प्रमाणपत्रे सादर न केल्याचा कॅगच्या आवाहलात म्हंटले आहे.
त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत उत्तर दिले. विरोधक कॅगच्या अहवालाचा चुकीचा अर्थ काढून त्याला घोटाळ्याचे स्वरूप देत आल्याचे फडणवीस यांनीसांगितले. उपयोगिता प्रमाणपत्र थकीत राहिल्याने घोटाळा कसा होऊ शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उपयोगिता प्रमाणपत्र थकीत राहिल्याने घोटाळा कसा होऊ शकतो?
कॅगच्या अहवालाचा चुकीचा अर्थ काढून त्याला घोटाळ्याचे स्वरूप देण्यात आले: देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती pic.twitter.com/KpkS5csJkF— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) December 21, 2019
कॅगमध्ये दाखवण्यात आलेली ४६ % कामे फडणवीस यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याची होती. सिंचन प्रकल्पांवर ८३ हजार कोटींचा खर्च करूनही राज्याला त्याचा अपेक्षित लाभ झालेला नाही, असा ठपकाही कॅगने ठेवला आहे.