#CAA : एनपीआरवर विधायक चर्चा व्हावी- उपराष्ट्रपतीं

हैदराबाद : नागरिकत्व कायदा आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अशा विषयावर निदर्शने किंवा हिंसाचारला प्रोत्साहन देण्याऐवजी त्यावर विधायक चर्चा घडवून आणली पाहिजे अशी सुचना उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू यांनी केली आहे.

लोकांना या प्रस्तावांविषयी नीट माहिती करून दिली पाहिजे आणि त्यावर अर्थपुर्ण व विधायक चर्चा घडवून आणली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. हे प्रस्ताव नेमके का आणले आहेत, त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे, त्याची गरज काय हे लोकांना नीट समजाऊन सांगितले पाहिजे.

त्यावर लोकांनी ज्या काही विधायक सुचना केल्या तर त्याचाही विचार केला पाहिजे असेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. जर आपण अशा वादग्रस्त विषयावर चर्चा केली तर आपली सिस्टीम बळकट होईल आणि लोकांनाही त्याविषयी नीट माहिती समजू शकेल असे ते म्हणाले.

आंध्रप्रदेशचे दिवंगज माजी मुख्यमंत्री एम चन्नारेड्डी यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे उद्‌घाटन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की एखादी बाब मान्य होणे किंवा त्याविषयी मतभेद होणे हा लोकशाहीचा गाभा आहे.

आपल्याला आवडू किंवा ना आवडू एखाद्या विषयावरील दुसरी बाजूही नीट समजून घेणे आवश्‍यक आहे आणि त्यानुसार त्यात सुधारणाही घडवून आणल्या गेल्या पाहिजेत असेही उपराष्ट्रपतींनी म्हटले आहे. नायडू यांनी या निमीत्त मोदी सरकारलाच कानपिचक्‍या दिल्या आहेत असे मानले जात आहे.

तथापी नागरिकत्व कायदा किंवा एनपीआर यावर हिंसाचार मात्र पुर्णत: अयोग्य आहे असे मतही त्यांनी व्यक्त केले. एखाद्या सरकारी धोरणावर टीका करताना

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.