बिदर (कर्नाटक) – सीएए अणि एनआरसी विरोधी आंदोलनासाठी शालेय विद्यार्थ्यांचा वापर करणाऱ्या शाळेला कर्नाटक पोलिसांनी टाळे ठोकले आहे. कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातल्या शाहीन स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांना सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनासाठी एका कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात आले होते. हा कार्यक्रम 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाटक अवमानकारक असल्याची टीका संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामध्ये नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी जर कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली गेली, तर अशी मागणी करणाऱ्या व्यक्तीला स्लीपरने मारले पाहिजे, असे सूचक विधान या नाटकामध्ये करण्यात आले आहे. या प्रकरणी शाळा प्रशासनाच्याविरोधात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.