नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशातील सुमारे 17 राज्यांतील विधानसभेच्या 64 जागांच्या व बिहार मधील समस्तीपुर या एका लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीची आज घोषणा केली. मात्र सातारा लोकसभा मतदार संघातील निवडणुक मात्र यावेळी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक आता विधानसभा निवडणुकीनंतर पुढील वर्षाच्या सुरूवातीलाच होंईल असे सांगण्यात येत आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी राजीनामा दिल्याने येथे या विधानसभेबरोबरच पोटनिवडणूक होंणे अपेक्षित होते. पण तसे न झाल्याने उदयनराजे भोसले यांना आता पुढील निवडणुकीसाठी मोठीच प्रतिक्षा करावी लागणार आहे. आज ज्या राज्यात पोट निवडणुका जाहीर झाल्या, त्यात कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचाही समावेश आहे. या पोटनिवडणुकांच्या निकालावर येडियुरप्पा सरकारचे भवितव्य अवलंबून असणार आहे.