पोटनिवडणूक झाली, तरी 26 जागा रिक्‍तच

खेड तालुक्‍यातील 18 ग्रामपंचायतींची स्थिती : जात वैधता प्रमाणपत्रच नाही

राजगुरूनगर- खेड तालुक्‍यातील एकूण 24 ग्रामपंचायतीच्या 35 रिक्‍त जागांच्या पोटनिवडणुकीत 4 ग्रामपंचायतीच्या 6 जागा बिनविरोध झाल्या. तरीसुद्धा 18 ग्रामपंचायतीच्या एकूण 26 जागा रिक्‍तच राहिल्या असताना; मात्र वारंवार या रिक्‍त जागांच्या पोटनिवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जात आहे. या संपुर्ण आरक्षित जागांचा आढावा घेतला असता अनेक गावांमध्ये जाहीर झालेल्या आरक्षणासाठी मतदार आहेत; मात्र त्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्याने अनेक जागा रिक्‍त राहत आहेत.

खेड तालुक्‍यातील टेकवडी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीसह 3 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्‍त सरपंचपदाची आणि 24 ग्रामपंचायतीच्या 38 जागांच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. 8) शांततेत मतदान झाले. राजगुरूनगर येथील क्रीडा संकुलमध्ये मतमोजणी झाली. सोमवारी (दि. 9) मतमोजणी झाली. त्यात विजयी झालेल्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गुलाल, भंडाऱ्याची उधळण करीत जल्लोष केला.

टेकवडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत सरपंचपदी विठ्ठल शत्रुघ्न शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. तर 6 जागांपैकी 2 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने रिक्‍त राहिल्या. तर ज्ञानु सोनु पवार, सारीका प्रकाश जाचक, गेनु रामभाऊ बेंडुरे, दिपाली दत्ता शिर्के यांची बिनविरोध निवड यापूर्वी झाली आहे.

  • निवडून आलेले सदस्य (ग्रामपंचायत) :
    साकुर्डी : अर्चना गणेश सुपे, मेदकरवाडी : छाया ज्ञानेश्‍वर भुजबळ (बिनविरोध). भोमाळे : मोहिनी सोनु वाजे, अश्‍विनी मधुकर भोमाळे (दोघे बिनविरोध). एकलहरे : गणेश कृष्णकांत भोजने, पूजा रवींद्र भालेराव (दोघे बिनविरोध), कुरुळी : बाळासाहेब शिवराम बागडे, चिंबळी : समीर विश्‍वनाथ जैद, गणेश श्रीकांत जाधव.
  • निवडून आलेले सरपंच (गाव)
    निवडणुकीत निवडून आलेले सरपंच : सुरेखा संतोष होले (होलेवाडी), महादेव विश्‍वनाथ बचुटे. बिधविरोध : मंगल ज्ञानेश्‍वर पारधी (सायगाव).

Leave A Reply

Your email address will not be published.