निमसाखर- शेतकऱ्यांना शेती व्यवसाय वाढीव व अन्य व्यवसायासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने वेळोवेळी शेतकऱ्यांना आणि व्यावसायिकांना कर्ज पुरवठा केला जात आहे; परंतु नियमित कर्ज परत फेड होत नसून बॅंक व शेतकरी व्यावसायिक यांचे नाते अतुट राहण्यासाठी शेतकऱ्यांनी व व्यावसायिकांनी नियमित कर्जफेड करावी, असे आवाहन बॅंक ऑफ महाराष्ट्र, पुणे ईस्टचे झोनल अधिकारी शिवाजी धुमाळ यांनी केले आहे. शेळगाव (ता.इंदापूर) येथील भैरवनाथ सोसायटी कार्यालयात बॅंक ऑफ महाराष्ट्र लासुर्णे, निमगाव केतकी यांच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना धुमाळ बोलत होते.
यावेळी लासुर्णे शाखेचे मुख्य प्रबंधक जीमस परेरा, निमगाव केतकी शाखेच्या शुभांगी पवार, कृषी अधिकारी सौरभ काळे, वसुली अधिकारी महेश पाठक उपस्थित होते. यावेळी जीमस परेरा यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींचे निरासन केले. शिवाय यावेळी शेळगाव निमगाव केतकीतील शेतकऱ्यांना त्वरित कर्ज वितरण परवानगी पत्रही देण्यात आले. शेतकरी मेळाव्यास डाळींबरत्न बापूराव दुधाळ, लक्ष्मण खराडे, कुशाबा बनसोडे, विठ्ठल जाधव, छगन शिंगाडे, संतोष भांगे, ललित शिंगाडे, कैलास खराडे, रामहरी दुधाळ, पोलीस पाटील संतोष ननवरे,आजिनाथ बनसोडे, मनोज जाधवसह मोठ्या संख्येने शेतकरी व्यावसायिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार लासुर्णे शाखेचे कृषी अधिकारी सौरभ काळे यांनी केले.