निमसाखर- निमगाव केतकी, निमसाखर जिल्हा परिषद गटाच्या सदस्या भारती मोहन दुधाळ यांच्या संकल्पनेतून पुणे जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समिती कृषी विभागामार्फत शेळगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र, शारदानगर येथे गुरुवारी (दि. 16) एकदिवसीय अभ्यास दौरा सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
या शेतकरी अभ्यास दौरा सहलीचे उद्घाटन कृषीनिष्ठ शेतकरी मोहन दुधाळ, सरपंच रामदास शिंगाडे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले. यावेळी शिक्षक संघाचे माजी सभापती हनुमंत माने, “कर्मयोगी’ंचे संचालक राहुल जाधव, आबासाहेब शिंगाडे, जलसंपदा विभागाचे हनुमंत ननवरे, विठ्ठल ननवरे, आबासाहेब दुधाळ,सुभाष दुधाळ, रामचंद्र बनसोडे, मनोहर जाधव यांसह अन्य शेतकरी यावेळी उपस्थित होते.