चीनी बॅंकांकडून लंडनच्या कोर्टात खटला दाखल
मुंबई – रिलायन्स ग्रुपचे प्रमुख अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. अनिल अंबानी यांच्या विरोधात 3 चीनी बॅंकांनी लंडनमधील न्यायालयात खटला दाखल केला आहे. इंडस्ट्रियल ऍण्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बॅंक आणि एक्सपोर्ट-इंपोर्ट बॅंक ऑफ चायना या 3 बॅंकांनी 48.53 अब्ज रुपयांचा दावा अंबानी यांच्याविरोधात ठोकला आहे.
या बॅंकांनी दावा केला आहे की, रिलायन्स कम्युनिकेशन्स म्हणजेच आरकॉमला 2012 मध्ये 92.52 कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. हे कर्ज फेडण्यात आले नाही, असे याचिकेत नमुद करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानींना टेलिकॉम उपकरणे बनवणारी कंपनी एरिक्सनच्या कर्जाची परतफेड करण्याचा आदेश दिला होता. परंतु अनिल अंबानींनी जाणीवपूर्वक परतफेड केली नाही, असे सांगत अंबानींना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते.