मुंबई – कन्नड अभिनेता सुपरस्टार यश आज त्याचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. यशने चित्रपटसृष्टीत गॉडफादरशिवाय मोठा ठसा उमटवला. त्याच्या ‘KGF: Chapter 1’ आणि ‘KGF: Chapter 2’ या चित्रपटांचे ऐतिहासिक यश लोकांनी पाहिले आहे. ज्याने जगभरात अनेक विक्रम मोडले आहेत. या यशापर्यंतचा मार्ग यशासाठी सुखकर नव्हता.
यशचा जन्म 8 जानेवारी 1986 रोजी कर्नाटकातील भुवनहल्ली जिल्ह्यातील हसन या छोट्या गावात झाला. यशचे खरे नाव नवीन कुमार गौडा आहे. यशचे वडील अरुणकुमार गौडा हे कर्नाटक राज्य परिवहन बस सेवेत बस चालक आहेत. अभिनेता यश हा कन्नड चित्रपट इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चाहते त्याला प्रेमाने ‘रॉकिंग स्टार’ म्हणतात. यशने 2008 मध्ये ‘मोगेना मनसू’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तो ‘राजधानी’, ‘ड्रामा’, ‘गुगली’, ‘राजा हुली’, ‘मिस्टर अँड मिसेस रामाचारी’, ‘मास्टरपीस’ आणि ‘KGF: Chapter 1’ आणि ‘KGF: Chapter 2’ यासह अनेक चित्रपटांमध्ये दिसला.
यशने त्याचे बालपण म्हैसूरमध्ये घालवले आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनय शिकण्यासाठी बिनाका नाटक मंडळात प्रवेश केला. यानंतर यशने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले, 2008 मध्ये त्याला पहिला चित्रपट मिळाला. या चित्रपटात त्याची सहकलाकार राधिका पंडित होती, जी आज त्यांची पत्नी आहे. या जोडीला दोन मुलेही आहेत. राधिका आणि यश एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. यशने आतापर्यंत चित्रपटांमध्ये काम केले आहे. परंतु चाहत्यांना आता केजीएफच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा लागली आहे.