IPL Highest Total Record : आयपीएल 2024 आतापर्यंत फलंदाजांसाठी खूप छान ठरले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मोठी धावसंख्या पाहायला मिळत आहे. याच मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 2013 मध्ये बनवलेल्या सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला गेला. मात्र या मोसमात मोठी धावसंख्या उभारणयाची लाट आली आहे, असं म्हणावं लागेल. कारण, गेल्या 16 वर्षांच्या आयपीएलमध्ये, सर्वात मोठी धावसंख्या फक्त एकदाच केली गेली आहे, परंतु या हंगामात हा मोठ्या धावसंख्येचा विक्रम एकदा नव्हे तर चार वेळा मोडीत निघाला आहे.
आयपीएल 2024 च्या पहिल्या 35 सामन्यांमध्ये, RCB च्या सर्वाधिक 263 धावसंख्येचा विक्रम चार वेळा मोडीत निघाला आहे, जो शेवटच्या हंगामात म्हणजे IPL 2023 पर्यंत स्पर्धेच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम होता. हैदराबादने या मोसमात आतापर्यंत बेंगळुरूचा हा विक्रम सर्वाधिक तीन वेळा आणि कोलकाताने एकदा मोडीत काढला आहे.
सध्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या 3 बाद 287 धावा आहे, जी हैदराबादने या हंगामात बेंगळुरूविरुद्ध केली होती. त्यानंतर यादीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्याही हैदराबादच्या नावावर आहे. याच मोसमात हैदराबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात 3 बाद 277 धावा केल्या होत्या.
𝗔 𝘂𝗻𝗶𝗾𝘂𝗲 𝗺𝗶𝗹𝗲𝘀𝘁𝗼𝗻𝗲 𝗮𝗰𝗵𝗶𝗲𝘃𝗲𝗱 🌟
We are now the only team in IPL history to score 2⃣5⃣0⃣+ runs on 3 occasions 🔥💪 pic.twitter.com/Pa4k77NDOG
— SunRisers Hyderabad (@SunRisers) April 21, 2024
IPL Highest Total Record…
हैदराबाद (SRH) 287/3 vs बेंगळुरू (RCB), IPL 2024.
हैदराबाद (SRH) 277/3 vs मुंबई (MI), IPL 2024.
कोलकाता (KKR) 272/7 vs दिल्ली (DC), IPL 2024.
हैदराबाद (SRH) 266/7 vs (DC), IPL 2024.
बेंगळुरू (RCB) 263/5 vs (पुणे) PWI, IPL 2013.
T20 World Cup 2024 : टी-20 वर्ल्ड कप खेळण्याबाबत दिनेश कार्तिकचे मोठे वक्तव्य…
हैदराबाद संघांची कामगिरी…
या मोसमात हैदराबादने आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत, ज्यात 5 जिंकले आहेत. 5 विजयांसह हैदराबाद पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. संघाचा निव्वळ रन रेट +0.914 आहे. हैदराबादला आतापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.