पाटणा : बिहारमधील रोहतास जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी एका युवतीला घरात घुसून गोळी मारली आहे. काही दिवसांपूर्वी युवतीने बलात्काराच्या प्रयत्नासाठी चार जणांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी रात्री राजपूर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडल्याचे पोलिसांनी बुधवारी सांगितले.
रोहतासचे पोलिस अधीक्षक सत्यवीर सिंह म्हणाले की, रविवारी पोलिसांनी सर्व आरोपी जफर खान, फारुख खान, शार्बूक खान आणि इतरांना अटक केली. सासारामचे उपविभागीय पोलिस अधिकारी राज कुमार यांनी सांगितले कि, चार हल्लेखोरांनी पत्रकार सांगून घरात प्रवेश केला. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने मुलीवर गोळी झाडली. पोलिसांनी सांगितले कि मुलीच्या गळ्याला गोळी लागली आहे. युवतीला रुग्णालयात दाखल केले असून, प्रकृती स्थिर आहे.