बुलढाणा – पत्नीला कार शिकवत असताना ब्रेक ऐवजी एक्सलेटर दबल्याने कार थेट विहिरीत कोसळल्याची घटना घडली आहे. बुलढाण्यातील देऊळगाव राजा येथील रामनगर परिसरात ही घटना घडली. कारमध्ये पती पत्नी आणि एक लहान मुलगी होते.
दरम्यान, पती बचावला असून पत्नी आणि लहान मुलीचा शोध सुरु आहे. दरम्यान आई व मुलीचा शोध घेण्यासाठी विहिरीत उतरलेला तरूणही बुडाला आहे. शोधकार्य आणि बचावकार्य सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचले आहेत. ही घटना आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. तीन तासांपासून बचाव कार्य सुरु आहे मात्र अद्याप त्यांना बाहेर काढण्यात यश आलेले नाही.