“तुझ्या पत्नीला जेलमध्ये पाठवू अन् मुलांची हत्या करू”; 7 पानी सुसाईड नोट लिहून बिल्डरची आत्महत्या

गाजियाबाद – सावकाराच्या जाचाला कंटाळून एका बिल्डरने पंख्याला लटकून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशच्या गाजियाबाद जिल्ह्यातील साहिबाबादमध्ये घडली असून मृत्यूपुर्वी बिल्डरने 7 पानी सुसाईड नोट लिहली आहे.

धर्मेंद कुमार असे आत्महत्या करणाऱ्या बिल्डरचे नाव आहे. ते मूळचे मेरठचे असून २ वर्षापासून पत्नी मोनिका आणि मुलगा लक्कीसह डीएलएफ कॉलनीच्या ३ मजल्याच्या बंगल्यात राहतात. वरील २ मजले भाड्याने देण्यात आले होते. धर्मेंद्रचा मोठा मुलगा फरिदाबाद येथे शिक्षणासाठी गेला होता. मागील काही दिवसांपासून धर्मेंद्र तणावाखाली जगत होते.

धर्मेंद्र यांनी आत्महत्या केली त्यावेळी त्यांच्या घरात कुणीच नव्हते. दरम्यान शेजाऱ्यांनी धर्मेंद्र यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहताच त्यांनी त्यांचा भाऊ दीपक यांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर राजनगर एक्सटेंशन येथून दीपक घटनास्थळी पोहचला तेव्हा दरवाजा उघडताच धर्मेंद्र पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.

पोलिसांनी घेतलेल्या जबाबानुसार पत्नी मोनिका आणि भाऊ दीपक यांनी सांगितले की, धर्मेंद्र कुमार यांनी २ वर्षापूर्वी लोनीच्या रिस्तल गावातील रहिवासी नरेश आणि प्रविण यांच्याकडून काही कामानिमित्त ३ लाख रुपये कर्ज १० टक्के व्याजाने घेतले होते. १० टक्के व्याज आकारुनही धर्मेंदवर दबाव टाकण्यात येत होता. नरेश आणि प्रविण या दोघांमुळे पतीने आत्महत्या केल्याचं पत्नी मोनिकाचा आरोप आहे.

धर्मेंद्र कुमारची सुसाईट नोट
मी धर्मेंद्र कुमार स्वत:चं आयुष्य संपवत आहे. मला न्याय मिळेल हीच अपेक्षा प्रशासनाकडून आहे. मी नरेश आणि प्रविणकडून कर्ज घेतलं होते. ते दोघं माझी फसवणूक करून माझा फ्लॅट हडपण्याचा प्रयत्न करत होते. मी माझं सोनं विकून पैसे दिले तरी त्यांचे पोट भरले नाही.

ते मला वारंवार ब्लॅकमेल करत होते. माझ्या पत्नीला आणि मला मारून टाकू. त्यांच्याकडे बेकायदेशीर शस्त्रंही होती. तुझ्या पत्नीला जेलमध्ये पाठवू आणि मुलांची हत्या करू अशा धमकी दिली जात होती. माझं कुटुंबावर खूप प्रेम आहे. कदाचित माझ्या या निर्णयानं ते दुखावतील. मला माफ करा. प्लीज माझ्या कुटुंबाला आणि मित्रांना त्रास देऊ नका असं सुसाईड नोटमध्ये लिहिले धर्मेंद्र यांनी लिहले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.