Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी नॉर्थ ब्लॉकमध्ये हलवा सोहळा आयोजित केला होता. बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेचा हा अंतिम टप्पा आहे. दरवर्षी, बजेट तयार झाल्यानंतर, लॉक-इन प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित केला जातो.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2024 रोजी लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर करतील. यावेळीही बजेट पेपर लेस असेल आणि मोबाइल अॅपवर बजेटची सर्व कागदपत्रे उपलब्ध असतील. वृत्तसंस्था एएनआयने अर्थसंकल्पापूर्वी आयोजित केलेल्या हलव्याच्या समारंभाचा व्हिडिओ शेअर केला आहे.
#WATCH | Delhi | The Halwa ceremony, marking the final stage of the Budget preparation process for Interim Union Budget 2024, was held in North Block, today, in the presence of Union Finance & Corporate Affairs Minister Nirmala Sitharaman and Union Minister of State for Finance… pic.twitter.com/wjoyI5QqQ3
— ANI (@ANI) January 24, 2024
1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार –
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावेळी सरकार व्होट ऑन अकाउंट बजेट आणणार आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असेल.
देशात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित सरकार 2024-25 या आर्थिक वर्षासाठी पूर्ण अर्थसंकल्प आणणार आहे.
बजेट पेपर लेस –
केंद्र सरकार गेल्या तीन वर्षांपासून पेपरलेस बजेट सादर करत आहे. यावेळी आणला जाणारा अंतरिम अर्थसंकल्पही पेपरलेस असेल. म्हणजेच बजेटची सर्व कागदपत्रे केंद्रीय अर्थसंकल्प मोबाइल अॅपवर उपलब्ध असेल.
ही कागदपत्रे हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असतील. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोअरसह केंद्रीय बजेटच्या वेब पोर्टलवरून डाउनलोड केले जाऊ शकते. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषणही अॅपवर पाहता येणार आहे.
कोण उपस्थित होते?
हलवा समारंभात केंद्रीय अर्थमंत्र्यांसह केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, वित्त आणि खर्च सचिव डॉ.टी.व्ही. सोमनाथन; आर्थिक व्यवहार सचिव अजय सेठ, डीआयपीएएम सचिव तुहिन कांत पांडे, महसूल सचिव संजय मल्होत्रा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) चे अध्यक्ष नितीन गुप्ता, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (सीबीआयसी) चे अध्यक्ष संजय कुमार अग्रवाल आणि अतिरिक्त सचिव (अर्थसंकल्प) आशिष वाचानी, अर्थसंकल्प तयार करणे आणि संकलन प्रक्रियेत गुंतलेले वित्त मंत्रालयाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी देखील उपस्थित होते.
हा सोहळा का होतो?
वास्तविक, प्रत्येक भारतात कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी तोंड गोड करण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी हलवा समारंभ आयोजित केला जातो. अर्थसंकल्पाशी संबंधित अधिकाऱ्यांना बाहेरील जगापासून वेगळे ठेवण्यासाठीही हा सोहळा केला जातो. अर्थसंकल्पीय निर्णय किंवा धोरणांची गोपनीयता राखणे हा त्याचा उद्देश आहे. हे अधिकारी एक प्रकारे नजरकैदेतच राहतात. अर्थमंत्र्यांनी लोकसभेत अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण केल्यानंतरच ते पुढे येतात.