देहूरोड – देहू शिवनगरी जवळील इंद्रायणी नदीतील बसंत बंधाऱ्यातजवळील सांडपाणी वाहिनीच्या चेंबर क्र. 4 लगत अनोळखी तरुणाचा छिन्न- विछिन्न अवस्थेतील कुजलेला मृतदेह दोन दिवसांपूर्वी आढळून आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अज्ञात कारणावरून अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवला आहे.
देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूगाव शिवनगरीजवळ इंद्रायणी नदीच्या वसंत बंधाराजवळ सांडपाणी वाहिनी चेंबर क्र. 4 जवळ अंदाजे वीस ते पंचवीस वर्षे वयाच्या तरुणाचा विवस्त्रावस्थेतील मृतदेह रविवारी पोलिसांना आढळून आला होता. त्याच्या चेहरा रानटी जनावराने फाडल्याने छिन्न विछिन्न अवस्थेत होते आणि संपूर्ण शरीरावर अनेक जखमा असून, धारदार शस्त्राने गुप्तांग छाटण्यात आले असल्याचे तसेच चार दिवसांपूर्वीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आले.
पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ओळख पटू नये म्हणून त्याचा चेहरा विद्रूप करुन त्याला विवस्त्र अवस्थेत टाकून देण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोडे, सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण यांनी पाहणी केली. सोमवारी उशिरा या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध अज्ञात कारणावरून खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक किरण कणसे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार तपास करीत आहेत.
पोलिसांकडून आवाहन
अनोळखी पुरुष जातीचे वर्णन – वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, रंगाने गोरा, चेहरा विद्रुप झाल्याने चेहऱ्याचे वर्णन समजुन येत नाही. डोक्यास केस नसलेले, त्याचे दोन्ही पायांवर चपलांचे बंदाने काळसर डाग पडलेले, त्याचे लिंग रानटी जनावराने फाडल्यासारखे दिसत असलेले असे वर्णनाचे वरील इसमास कोणी ओळखत असल्यास संपर्क वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे – 8888712736, सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद गज्जेवार – 86 98740083, देहूरोड पोलीस ठाणे – 8317271288/02027671288, नियंत्रण कक्ष – 020-26209127.