लंडन – मानवी रक्ताचे ए, बी, एबी आणि ओ हे प्राथमिक रक्तगट ( Blood Group ) आहेत. त्यात बॉम्बे रक्तगटाची भर काही वर्षांपूर्वी पडली होती. ब्रिटन मधील वैज्ञानिकांनी एक नवा रक्तगट शोधला असून हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ आहे. ब्रिस्टल युनिव्हर्सिटी आणि नॅशनल हेल्थ सर्व्हे ब्लड अँड ट्रान्सप्लांट अश्या दोन संस्थातील संशोधकांनी मिळून हे संशोधन केले आहे.
या रक्तगटाला ( Blood Group ) “इर’असे नाव देण्यात आले आहे. गेली तीस वर्षे यावर संशोधन सुरू होते. पण त्याचे कोडे उलगडत नव्हते. हा रक्तगट व त्यातील घटक चक्रावणारे आहेत. गर्भातील बाळासाठी हा रक्तगट जीवघेणा ठरू शकतो, अशी माहिती संशोधनातून पुढे आली आहे.
या रक्तगटाचे ( Blood Group ) दोन नमुने ब्रिस्टल विद्यापीठात आले होते. या दोघी महिला होत्या आणि दोघीही गरोदर होत्या. पण त्यांच्या बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. या दोघांचाही रक्त गट “इर’ होता. आई आणि गर्भातील बाळाचा रक्तगट वेगळा असल्याने प्रतिकारक शक्ती अनियंत्रित झाली होती. यात आईच्या “इर’ रक्तगटामुळे मुलाच्या रक्तगटाच्या विरुद्ध आईचे शरीर अँटीबॉडिज बनवू लागते.
यामुळे बाळात जन्मजात रक्तपेशींशी संबंधित आजार होतो. यात बाळाचा मृत्यू ओढवतो. या नव्या शोधामुळे गर्भातील बाळाचा जीव कसा वाचवायचा यावर संशोधन करणे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे.