पगार कमी म्हणून पंतप्रधान देणार ‘राजीनामा’

लंडन – पंतप्रधान म्हणून आपल्याला मिळत असलेल्या पगारात भागत नसल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या वसंत ऋतूपर्यंत आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होऊ, असे सूतोवाच जॉन्सन यांनी केले आहे. जॉन्सन यांना सध्या पंतप्रधान म्हणून 150,402 पौंड इतके मानधन मिळते आहे.

आपल्या पूर्वीच्या उद्योगात मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा हे उत्पन्न कमी असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले असल्याचे वृत्त ब्रिटनमधून प्रसिद्ध होणाऱ्या एका नियतकालिकाने प्रसिद्ध केले आहे.

जॉन्सन यांना वर्तमानपत्राचे स्तंभलेखक म्हणून दर महिन्याला 23 हजार पौंड इतके मानधन मिळत होते. आणखी सहा महिन्यांनंतर युरोपीय संघातून ब्रिटनने बाहेर पडण्याच्या महत्त्वाच्या जबाबदारीतून मोकळे झाल्यावर आपण पंतप्रधान पदावरून पायउतार होऊ, असे जॉन्सन यांनी म्हटले आहे.

बोरिस जॉन्सन यांना एकूण 6 मुले आहेत. त्यापैकी काही जण वयाने लहान असल्याने आर्थिकदृष्ट्‌या अवलंबून आहेत. जॉन्सन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीला उपजीविकेसाठी जॉन्सन यांच्याकडून पोटगीही दिली जाते. टोरी पार्टीचे नेते बनण्यापूर्वी जॉन्सन हे “द टेलिग्राफ’ नावाच्या दैनिकात नोकरीला होते.

तेथे त्यांना वर्षाला 275,000 पौंड इतके मानधन होते. याशिवाय महिन्याला दोन व्याख्याने देऊन त्यांना 160,000 पौंडांचे उत्पन्नही मिळत असे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.