मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच वरिष्ठ आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नियुक्तीला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.
सीएमओ आणि मित्रमध्ये या दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने मंत्रालयातील वरिष्ठ सनदी अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत.
मित्रच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. या संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि शिवसेनेचे माजी आमदार डॉ. राजेश क्षीरसागर यांची शिंदे-फडणवीस सरकारने नियुक्ती केली होती.
“एकटी कॉंग्रेस मोदींना टक्कर देऊ शकत नाही,विरोधकांची…” – के. सी. वेणुगोपाल
अजय आशर हे ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून गेली काही वर्षे ते एकनाथ शिंदे यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. तर, आता नियुक्ती करण्यात आलेले सीईओ प्रवीणसिंह परदेशी हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.