नवी दिल्ली – कुस्तीपटुंनी दिल्लीमध्ये सुरु केलेलं आंदोलन काही केल्या थांबताना दिसत नाही. पोलिसांनी खेळाडूंच्या या आंदोलनात हस्तक्षेप केल्यानंतर देखील हे आंदोलन थांबताना दिसत नाही. साक्षी मलिक, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्यासह देशातील अव्वल कुस्तीपटू शेकडो समर्थकांसह त्यांची ऑलिम्पिक आणि जागतिक पदके गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी पोहचले आहेत. यावर आता दिल्ली पोलीस तपास करत असल्याची महती ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिली आहे.
खाप आणि शेतकरी नेत्यांच्या समजूतीनांतर आंदोलक कुस्तीपटूंनी पदके गंगेत विसर्जित केली नाहीत. सर्व खेळाडूंनी मागण्या मान्य करण्यासाठी पाच दिवसांची मुदत दिली आहे. मात्र खेळाडूंनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपांना सामोरे जात असलेले ब्रिजभूषण शरण सिंह म्हणाले की, कुस्तीपटू आपली पदके गंगा नदीत सोडू इच्छित असतील तर हा त्यांचा स्वतःचा निर्णय आहे, मी त्याला काय करू शकतो?, असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. या प्रकरणाची दिल्ली पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. जर आरोपांमध्ये काही तथ्य असेल तर मला अटक केली जाईल.”
कुस्तीपटूनी गंगा नदीत आपली मेडल्स वाहण्याचा निर्णय जाहीर करताच ‘हर की पौड़ी’ या ठिकाणी मोठा जनसमुदाय जमला होता. यावेळी सर्व प्रतिष्ठित खेळाडूंनी आपले मेडल्स घेऊन आल्याचं पाहायला मिळालं होत. मेडल्स विसर्जित करण्याच्या उद्देशाने आलेल्या खेळाडूंची राजकीय नेत्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सुमारे तासभर यावेळी चर्चा झाली. किसान नेता शाम सिंह मलिक आणि नरेश टीकेत यांनी यासाठी पाच दिवसांचा कालावधी मागितला असलयाचे देखील समोर आले.
23 एप्रिल रोजी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आघाडीच्या कुस्तीपटूंनी पुन्हा आंदोलन सुरू केले होते. ब्रिज भूषण यांच्यावर एका अल्पवयीन महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे.