तनिषाच्या खेळात सचिनची झलक; ब्रेट लीकडून कौतुक

मेलबर्न – सचिन तेंडुलकरकडून प्रेरणा घेत क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचे स्वप्न तर करोडो पाहतात, पण खरेच मैदानात उतरण्याचे भाग्य खूप कमी जणांना मिळते. मात्र, बाल्यावस्थेतच सचिनसह भारतीय संघाची अव्वल खेळाडू स्मृती मानधनादेखील आदर्श असलेल्या छोट्या तनिषा सेनने मात्र ऑस्ट्रेलियाच्या ब्रेट ली याला प्रभावित केले आहे. तनिषाच्या फलंदाजीची शैली पाहिली की सचिनच फलंदाजी करत आहे असे वाटते, अशा शब्दांत ब्रेट लीने तनिषाचे कौतुक केले आहे. आयसीसी टी20 वर्ल्ड कप या (ICC T20 World Cup) ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

ब्रेट लीने  सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सहा वर्षांची तनिषा अगदी सचिनसारखाच स्ट्रेट ड्राइव्ह मारताना दिसत आहे. ब्रेट लीने तनिषाला काही चेंडू गोलंदाजी केली. तिचे खेळपट्टीवर उभे राहणे, बॅट हातात धरण्याची पद्धत व स्ट्रोक मारतानाची शैली तंतोतंत सचिनसारखीच आहे, असे ब्रेट लीने सांगितले आहे.

सचिनची फॅन असली तरीही भारताच्या महिला क्रिकेट संघाची अव्वल खेळाडू स्मृती मानधना खूप आवडते तसेच स्मृती खेळते तोच कव्हर ड्राईव्हचा फटका मला खूप आवडतो, असे तनिषा सांगते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.