Dilip Valse Patil – मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरुन पडले आहेत. दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून हाथ फ्रॅक्चर झाला आहे. । Dilip Valse Patil
काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) March 28, 2024
त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया होणार आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वळसे पाटील यांना केले दाखल केले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागल्याने त्यांना किमान दोन महिने तरी विश्रांतीची गरज असणार आहे.
त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव यांचा प्रचार आणि आंबेगाव मधील प्रचार कोण करणार हा प्रश्न उपस्थित झालाय. दिलीप वळसे पाटील यांना अपघात झाल्याने त्याचा सर्वात मोठा फटका आढळरावांना बसणार आहे.