नवी दिल्ली: जगभरात करोनाच्या नव्या व्हेरिएंटने म्हणजेच ओमायक्रॉनने आता हातपाय पसारण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणखी काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ओमायक्रॉनसंदर्भात चिंता जगाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या मृत्यू संदर्भात इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांनी माहिती दिली. इंग्लंडमध्ये सोमवारी ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे पहिल्या रुग्णाचा मृत्यू झालाय, असं जॉनसन यांनी म्हटलं आहे.
ओमायक्रॉनचे भारतात देखील अनेक रुग्ण आढळून आले आहेत. मात्र ओमायक्रॉन व्हेरियंटने भारतात अद्याप एकही मृत्यू झालेला नाही.
जगभरात करोनाच्या नव्या व्हेरिएंटने म्हणजेच ओमायक्रॉनने आता हातपाय पसारण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता आंतरराष्ट्रीय विमानसेवा आणखी काही काळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.