मुंबई – राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सुजय डहाके याने वैविध्यपूर्ण मराठी चित्रपट दिले आहेत. चार वर्षांच्या कालावधी नंतर सुजय त्याच्या चाहत्यांसाठी पुन्हा एकदा नवीन अफलातून भेट घेऊन येत असून त्याच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘केसरी’ असे आहे. नुकतेच ‘केसरी’ हा चित्रपट २८ फेब्रुवारीला रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात कुस्ती म्हणजे नुसतीच मस्तवाल शरीराची मस्ती नाही, तो बुध्दीचा तुर्याने आणि मनापासून खेळला जाणारा खेळ आहे, हे दाखवण्यात आले आहे.
नुकताच ‘केसरी’ चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक सुजय डहाकेने यांनी एक नामांकित मराठी वृत्तपत्र मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने मराठी चित्रपटसृष्टीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. “सध्या मराठीमध्ये सुरु असलेल्या प्रत्येक मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राह्मण मुलीच दिसतात. मग इतर मराठी मुली का नाही?” असा प्रश्न सुजयने विचारला आहे. त्यांच्या प्रश्नांवर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा दिसून येत आहे.