नागपूर – उपराजधानी नागपूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका प्रियकराने प्रियसीला न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले आहे. प्रियसीने प्रेमापोटी न्यूड व्हिडीओ कॉल केला मात्र तो कॉल रेकॉर्डिंग करून नंतर त्या प्रियकराने आपल्याच प्रियसीला धमकावल्याची घटना घडली आहे.
वैभव आवारी हिंगणघाट, वर्धा असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. वैभव व या मुलीचे फेसबुकवर आधी लगट वाढली नंतर मैत्रीचे रुपांत प्रेमात झाले. या दोघांचे हे प्रेमप्रकरण जवळपास तीन वर्षे चालले मात्र त्यानंतर वैभव मुलीकडे दुर्लक्ष करायला लागला व तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला तिचं प्रेम सिद्ध करण्यास सांगितले.
दरम्यान वैभवने मुलीला प्रेम सिद्ध करण्यसाठी न्यूड व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडले. त्याच्यावर विश्वास ठेऊन तिने सुद्धा कॉल केला मात्र तो व्हिडिओ कॉल वैभवने रेकॉर्ड केला. त्यानंतर सोशल मीडियावर हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकीही दिली.
घारबलेल्या प्रेयसीने नंतर थेट पोलिस स्टेशन गाठले. व वैभव विरोधात जरीपटका पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी वैभवला ताब्यात घेतले पुढील तपास पोलीस करत आहेत.